भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशा दोधीजणा एकविधं भावें । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या

aisha dodhijana ekavidhan bhaven | dyayavasi jiv ubhya thelya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐशा दोधीजणा एकविधं भावें । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥ धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ । सत्वाचेंचि बळ अंगामध्यें ॥२॥ पाजूनियां येईं बाळक्रासी स्तन । आम्ही दोघे जण येथें असों ॥३॥ न टाका मजला सांगोनि निघाली । बिर्‍हाडासी आली लागवेगें ॥४॥ घेऊनियां अंकीं पाडसें तीं दोन्ही । लावू-नियां स्तनीं शोक करी ॥५॥ एकमेकें सुखें राहावें अनन्य । तुटलें सौजन्य तुह्मां आह्मां ॥६॥ पति पडिलासे फांसीं सांडीतसे प्राण । आह्मांलागीं जाणें त्याच्यासंगें ॥७॥ ह्लदयीं धरोनी दिधलें चुंबन । तीं ह्मणती कोण पोशी आह्मां ॥८॥ येऊं तुह्मांसंगें देऊं आधीं प्राण । पुढील कारण तुह्मी पाहा ॥९॥ नामा म्हणे ऐसें पांचही ते एक । देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥