भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामीं

aikatanchi shabda houni kirat | rahila nivant eke gramin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामीं ॥१॥ पाळणपोषण विषयांची वोढी । करीतसे जोडी पात-काची ॥२॥ चण्ड भिल्लनाम घेतलें ठेऊनि । दुष्टभाव मनीं वाढ-विला ॥३॥ कासेसीं वाधुरा हातीं शूळं दंड । सामोग्री उदंड मेळविली ॥४॥ हिंदे नान वन पर्वत शिखरें । मारीतसे फार जीवजंतू ॥५॥ जातीचा स्वभाव लागला तयासी । कष्टे अहर्निशीं ह्मणे नामा ॥६॥