भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झालें कैसें अकस्मात

aikatanchi jiv jhala kasavis | hmane jhalen kaisen akasmat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झालें कैसें अकस्मात ॥१॥ आहां कपाळींचा भोग वोढवला । कांत तो नि-घाला सांडोनियां ॥२॥ कैंची बाळें कोण कोणाची सांगाती । पाहातां हे भ्रांति वाउगीची ॥३॥ ठायींची हे काया जायाची जाईल । वांचलिया फोल पतिविण ॥४॥ पतीविण सुख काय या संसारी । दु:ख कल्पवरी भोगावें कीं ॥५॥ नामा ह्मणे ऐसें चिंतोनियां मनीं । आली ती तत्क्षणीं हरणापाशीं ॥६॥