भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका सावधान कथा शिवरात्र । पावन पवित्र तिहीं लोकीं

aika savadhan katha shivaratra | pavan pavitra tihin lokin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐका सावधान कथा शिवरात्र । पावन पवित्र तिहीं लोकीं ॥१॥ भाव धरोनियां आचरती जरी । वास शिवपुरीं घडे त्यासी ॥२॥ उपवास आणि शिवाचें पूजन । रात्रीं जागरण विधि त्याचा ॥३॥ एक पसा पाणी एक बिल्वदळ । पूजन केवळ सोपें बहु ॥४॥ नामा ह्मेण करा नामाचा गजर । मुखीं हरहर शब्दमात्रें ॥५॥