भजनी मालिका
← भजनांकडे परत

आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची

ai je shikavi titen tumhi naika | nahin bhay shanka laukikachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥ लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥ ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि । पडिलें चिंतवनीं काय करूं ॥३॥ धडचि कांटीये घातलें हो कैसें । बळेंचि आपणा पिसें लावियेलें ॥४॥ सुखाचा संसार करोनि बारा वाटे । नांव केलें मोठें जगामाजीं ॥५॥ तोडियेला मोह सांडियेली माया । भुलविले तुमचिया चित्ता कोणें ॥६॥ कवणें पुण्य ऐसी जोडियेली जोडी । केली बिघडाबिघडी आम्हां तुम्हां ॥७॥ तुमचि हे गति लेकुरें नेणति । कोण चालविती घराचार ॥८॥ म्हणोनि माझें चित्त आपुलेनि उद्वेगें । कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ॥९॥ सर्वस्वें सांडोनि धरिला तुम्ही देव । येणें पुसिला ठाव संसारींचा ॥१०॥ आमची कणव न वाटेचि कांहीं । विनविते राजाई नामदेवा ॥११॥