भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहर्निशीं कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी

aharnishin kans base chintakrant | vichar pusat pradha-nasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहर्निशीं कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥ प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागें न येती पर-तोनी ॥२॥ आतां पुरुषार्थी कोण पाठवावा । तो मज सांगावा निव-डोनि ॥३॥ सांगती प्रधान धाडा असुरासुर । तंव तो असूर उभा राहे ॥४॥ म्हणे मत्यु नसे मज कोणा हातीं । द्वापारीं मारुती गुप्त झाला ॥५॥ ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । गौरविलें त्यासी नानापरी ॥६॥ नामा म्हणे काळें बोलविलें त्यासी । सत्वर वनासी येता झाला ॥७॥