भजनी मालिका
← भजनांकडे परत

अज्ञानबाळकें तुझा हाकारा केला । तेणें तये वेळां स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे

adnyanabalaken tujha hakara kela | tenen taye velan svarga bhedila | aikuni to dhavinnala | avo devi khechare

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अज्ञानबाळकें तुझा हाकारा केला । तेणें तये वेळां स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥ स्तंभीं प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हिं लोक । भेणें पळती शंखा – दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥ आली त्रिभुवन देवता । नाभी नाभीरे म्हणतां । माझा प्रर्‍हाद केउता । तो कवणें रे गांजिला ॥३॥ वदन पसरूनि विकाळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसे वडवानळ । शोषूं पाहे जळनिधि ॥४॥ संहार झाला नागकुळ । भ्याले अष्टहि लोकपाळ । स्वर्गीं सुटली खलबळ । अमरावतीं इंद्रासी ॥५॥ मग दैत्यातें पाचारित । लोह खणखणा वाजत । हाकीं अंबर गर्जत । तेणें कांपे मेदिनी ॥६॥ कवटाळूनि चहूं हातीं । विदारिलें चपेट-घातीं । जैस रुद्र प्रळयांतीं । तैसा हरी दिसतसे ॥७॥ दैत्य न मरे कवणें परी । मग तो धरिला जान्हूवरी । देखें उदर फोडूनि सत्वरी । अस्थि चूर्ण केली या ॥८॥ मौजे नाचती । मुक्ति दिल्ही दैल्य-नाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभयदाता भक्तांसीं ॥९॥