भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे

adaren japatan keshavachen nam | vaikunth hen dham payan pade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे ॥१॥ आणिक सायास करुनि कदापि । चौर्‍यांशींच्या सिपीं गुंफीं नका ॥२॥ याजसाठीं हरिनाम निरंतरीं । तारील निर्धारीं भाक माझी ॥३॥ भावभक्ती क्रिया नलगे आणिक । कीर्तन तारक म्हणे नामा ॥४॥